Thursday, September 11, 2014

आई ग आई कुशीत घे मला

||आई ग आई कुशीत घे मला ||



आई ग आई कुशीत घे मला,
    तुझ्या मऊ-मऊ हाताची उशी दे मला ,
        डोक्यावर हळू-हळू थाप दे मला ,

            तुझ्यापाशी आज झोपू दे मला |

आज उनात खेळत -खेळत खूप थकलो मी ,
       तुझ्या पदराची  सावली दे मला ,
        तुझ्या कुशीत थकवा मिटवू दे मला ,
            आई ग आई कुशीत घे मला |

शेजारच्या घराचे कांच फोडले मी ,
    बागायती मधून चोरीने आंबे तोडले मी,
        बाबांच्या  रागाने वाचव ग मला ,
            तुझ्या कुशीत लपू दे मला |

अंधाराची भीती वाटते ग आई ,
    एकटे असल्यावर भीती वाटते ग आई ,
        तू सोबती असली तर निशचींत झोप येते ,

            हळू-हळू गाणी म्हणत  जेव्हा तू थाप देते ,
तुझ्या कुशीत झोप कधी लागते कळतच नाही ,
    तुझ्या कुशीत भूतांचे स्वप्ने कधी पळतच नाही ,
        आज परत निर्भय होऊन झोपू दे मला ,
            आई ग आई कुशीत घे मला |



- पवन मोरे
  


image from ::co.aitkin.mn.us

No comments:

Post a Comment