सखी माझ्या संगी पावसात येशील का ?
सखी माझ्या संगी पावसात येशील का ?
पावसाच्या थेंब थेंब पानीत चिंब भिजशील का?
पावसा नंतरच्या पानीत माझ्या संगी कागद्याच्या होडी बरोबर खेळशील का?
बोल ग सखी माझ्या संगी पावसात येशील का?
पावसाच्या टीप टीप आवाज आणि ढगांच्या गर्जनेने,
तैयार झालेल्या त्या मधुर संगीतात माझ्या संगी नाचशील का?
वाटेवरच्या त्या चिखलाच्या पानीत माझ्या संगी खेळशील का?
बोल ग सखी बोल माझ्या संगी पावसात येशील का?
पावसाने बांधलेल्या आकाश आणि पृथ्वीला जोडणाऱ्या,
सतरंगी पुलावरून ढगान पर्यंत चालशील का?
पाउस पाडल्या नंतर पळून जाणाऱ्या ढगान बरोबर धावशील का?
बोल ग सखी बोल माझ्या संगी पावसात येशील का........
-पवन मोरे
No comments:
Post a Comment