Showing posts with label rains. Show all posts
Showing posts with label rains. Show all posts

Monday, July 8, 2013

सखी माझ्या संगी पावसात येशील का ?

सखी माझ्या संगी पावसात येशील का ?



सखी माझ्या संगी  पावसात येशील का ?

    पावसाच्या थेंब थेंब पानीत चिंब भिजशील का?
        पावसा नंतरच्या पानीत माझ्या संगी कागद्याच्या होडी
बरोबर खेळशील का?
            बोल ग सखी माझ्या संगी पावसात येशील का?
        पावसाच्या टीप टीप आवाज आणि ढगांच्या गर्जनेने,
         तैयार झालेल्या त्या मधुर संगीतात माझ्या संगी   नाचशील का?
            वाटेवरच्या त्या चिखलाच्या पानीत माझ्या संगी  खेळशील का?
                बोल ग सखी बोल माझ्या संगी पावसात येशील का?
  
     पावसाने बांधलेल्या आकाश आणि पृथ्वीला जोडणाऱ्या,

         सतरंगी पुलावरून ढगान  पर्यंत चालशील का?
             पाउस पाडल्या नंतर  पळून जाणाऱ्या ढगान बरोबर धावशील का?

                बोल ग सखी बोल माझ्या संगी पावसात येशील का........

        -पवन मोरे

Sunday, June 2, 2013

पहिल्या पावसाचा पहिला श्वास..

 

पहिल्या पावसाचा पहिला श्वास

पहिल्या पावसाचा पहिला श्वास..
थंड थंड वार्‍याचा शीतल आभास..
थेंब थेंब पाण्याने भीजलेले अंग..
आणि हृदयात शिरलेली ती नवी उमंग..

रस्त्यावर वाहणारी पाण्याची सर..
आणि अंगात शिरलेली थर थर..
पावसामधे तो गरम गरम चहा..
आणि सोबत खमंग जलेबि आहा !!!

ये रे ये रे पावसा ची कविता म्हणत ..
प्यार हुआ इकरार हुआ चे गाणे गुणगुणत ..
ढगांच्या गडगाडनार्‍या तालात...
मोरासारखे नाचतो आम्ही खुल्या आकाशात..

चिखलाच्या पाण्यात करतो मस्ती..
अशीच आमची उन्मुक्त हस्ती..
पावसाच्या पाण्यात विसरूनी जातो सारे गम..
आणि पाण्यात उड्या मारतो आम्ही...
ता रा रमपम ..ता रा रमपम ...ता रा रमपम .. :-D :-D

- पवन मोरे