तुझ्या सान्निध्याच्या लालसेमध्ये,
सरळ जाणारा रस्ता कधी
तुझ्या घराकडे वळतो
हे समजतच नाही
तुझ्या सान्निध्याच्या लालसेमध्ये
दिवस रात्र होतात,
कधी रात्रीची पहाट होते,
हे समजतच नाही
तुझ्या सान्निध्याच्या लालसेमध्ये
क्षणभराची आपली भेट,
महिने-वर्षे सारखी वाटते
हे समजतच नाही
तुझ्या सान्निध्याच्या लालसेमध्ये
माझे हे दोन शब्द,
कधी कवितेच्या ओळी होतात
हे समजतच नाही..
फक्त तुझ्या सान्निध्याच्या लालसेमध्ये