Wednesday, October 16, 2024

पावसाच्या सरी सारखे  समुद्र्याचे लाटा घेऊन आली ।

अचानक जोरात आलेल्या पाऊस नंतरच्या 

सर सर वाहणारी पाण्यासार्खी ,

तू आयुष्यात आली ।

आणि समुद्राच्या लाटे सारखी ,

सर्व ओढून घेऊन गेली ।


मी तर तुला पावसाच्या सरीसारखी 

बघत होतो,

माझ्या कागदाच्या होडीसह 

किनाऱ्यावर थांबलेलो,

आणि तू समुद्राच्या भरतीसारखी भरून आली ! 


माझी छोटीशी होडी 

तुझ्या उफान लाटांच्या जोरात हरवत गेली,

आणि मी फक्त तुझी परत येण्याची वाट बघत 

थांबलेलो


त्याच किनारायवर जिथे तू ,

पावसाच्या सरी सारखे 

समुद्र्याचे लाटा घेऊन आली ।



वाट बघतोय तुझी ,

माझी होडी मला परत दे 

नाहीतर मला पण घेऊन चल ,

तुह्या लाट सोवत त्य होडी पर्यंत ।


मी तुझी परत येण्याची वाट बघत 

थांबलो आहे 


त्याच किनारायवर जिथे तू ,

पावसाच्या सरी सारखे 

समुद्र्याचे लाटा घेऊन आली ।

  1. पवन

No comments:

Post a Comment