Sunday, June 2, 2013

पहिल्या पावसाचा पहिला श्वास..

 

पहिल्या पावसाचा पहिला श्वास

पहिल्या पावसाचा पहिला श्वास..
थंड थंड वार्‍याचा शीतल आभास..
थेंब थेंब पाण्याने भीजलेले अंग..
आणि हृदयात शिरलेली ती नवी उमंग..

रस्त्यावर वाहणारी पाण्याची सर..
आणि अंगात शिरलेली थर थर..
पावसामधे तो गरम गरम चहा..
आणि सोबत खमंग जलेबि आहा !!!

ये रे ये रे पावसा ची कविता म्हणत ..
प्यार हुआ इकरार हुआ चे गाणे गुणगुणत ..
ढगांच्या गडगाडनार्‍या तालात...
मोरासारखे नाचतो आम्ही खुल्या आकाशात..

चिखलाच्या पाण्यात करतो मस्ती..
अशीच आमची उन्मुक्त हस्ती..
पावसाच्या पाण्यात विसरूनी जातो सारे गम..
आणि पाण्यात उड्या मारतो आम्ही...
ता रा रमपम ..ता रा रमपम ...ता रा रमपम .. :-D :-D

- पवन मोरे

1 comment: